Indian Bank साक्षीदार न्युज ; – आता बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहे. इंडियन बँकेत डॉक्टर या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. आणि ही भरती कंत्राटी पद्धतीने करणार असून बॅँकेत अर्ज करणाऱयांनी उमेदवारांनी जेवढे शक्य होईल तितक्या लवकर अर्ज करावा .
इंडियन बँकेची ही भरती सुरु झाली असून याबाबत संपूर्ण माहिती indianbank.in या वेबसाइटवर देण्यात आलेली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत हि दिनांक २० डिसेंबर २०२४ पर्यंत आहे.
काय असेल यासाठी पात्रता
इंडियन बँकेतील डॉक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त अॅलोपॅथिक मेडिकल सिस्टीममधून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. जर का तुमच्याकडे १० वर्षे अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात .
इंडियन बँकेतील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शॉर्टलिंस्टिग केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्या परफॉर्मंसच्याआधारे त्यांची निवड करण्यात येणार आहे . या नोकरीसाठी २०,००० रुपये पगार मिळणार असून या नोकरीसाठी आपला अर्ज इंडियन बँक, झासी अंचल, ९२, सिविल लाइन्स, झाशी या ठिकाणी पाठवायचा आहे.