Film
साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | देशभर १३ ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. या दिनानिमित्त देशभरातील चित्रपटगृहांमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आवडते चित्रपट पाहायला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत फक्त ९९ रुपयांमध्ये तुमच्या आवडत्या चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.
नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आणि काही दिवसांपूर्वी रिलीज झालेले चित्रपट पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. शुक्रवारचा दिवस चित्रपटप्रेमींसाठी खास मेजवाणी असणार आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त कोण-कोणते चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
फुकरे ३
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त ‘फुकरे’ फ्रँचायझी चित्रपटाचा तिसरा भाग असलेल्या ‘फुकरे 3’ चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित या चित्रपटात पंकज त्रिपाठी, ऋचा चढ्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा आणि मनजोत सिंग हे कलाकार मुख्य भुमिकेत आहेत.
द व्हॅक्सिन वॉर
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षकांना ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट पाहायला मिळणार आहे. निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी एक सत्यकथा ‘द व्हॅक्सिन वॉर’ रुपेरी पडद्यावर आणली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, नाना पाटेकर आणि पल्लवी जोशी मुख्य भुमिकेत आहेत.
दोनो
राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली अवनीश बडजात्या दिग्दर्शित ‘दोनो’ ही नवीन काळातील प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आली. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात कनिका कपूर, रोहन खुराना, पूजन छाबरा, आदित्य नंदा आणि माणिक पापानेजा हे मुख्य भुमिकेत आहेत.
मिशन रानीगंज-द ग्रेट भारत रेस्क्यू
अभिनेता अक्षय कुमारच्या ‘मिशन राणीगंज – द ग्रेट भारत रेस्क्यू’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परिणीती चोप्रा, मुकेश एस भट्ट, कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, रवी किशन हे मुख्य भुमिकेत आहेत.