साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार दरमहा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवत आहे. झारखंडमधील खुंटी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटण दाबून हा हप्ता हस्तांतरित केला. या योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे.
कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती हवी असल्यास तुम्ही [email protected] वर ईमेल पाठवू शकता. यासोबतच 1555261 किंवा 1800115526 या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधता येईल. जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात पाठवले जाणार नाहीत. याशिवाय, अर्जामध्ये लिंग चूक, नावाची चूक, आधार क्रमांक इ. अशी कोणतीही चूक आढळल्यास, तरीही हप्त्याचे पैसे सरकार पाठवले जाणार नाहीत.
ही योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सुरू केली आहे. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आज भाऊबीजच्या निमित्ताने सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 वा हप्ताही पाठवण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे.