डीएड आणि बीएड्धारकांना आनंदाची बातमी : २० हजार शिक्षकांची होणार भरती !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १६ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक तरुण व तरुणींनी उच्च शिक्षण केले आहे पण आज देखील ते बेरोजगार आहे. यातच डीएड आणि बीएड्धारकांना आनंदाची बातमी समोर आली आहे. शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात आता नोकरीची संधी उपलब्ध होवू शकते.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्यात १३५०० शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या डीएड आणि बीएड महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे कल वाढेल, असे मत व्यक्त होत आहे. दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली तरीही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरती होण्यास अडचण होत आहे, मात्र दरवर्षी शिक्षक भरती झाली तर डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS