साक्षीदार | २५ ऑक्टोबर २०२३ | प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोईसुविधा, आरामदायी प्रवास द्यावा या दृष्टीने भारतीय रेल्वे मेड इन इंडियाअंतर्गत देशभरात हायस्पीड वंदे भारत ट्रेन सुरु केला आहे. देशभरात केद्र सरकार रेल्वेचे मोठे जाळे विणत असतांना नुकतेच वंदे भारत ट्रेनचे अनेक ठिकाणी सुरु झाल्या आहे तर आता मुंबई ते संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदराबाद दरम्यान आता वंदे भारत ट्रेन धावणार आहे. रेल्वे बोर्डाकडून मागितलेल्या सूचनेनंतर यासंदर्भातील मध्य रेल्वेने प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेवर वंदे भारत ट्रेनची संख्या चारवरून सहावर पोहचणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वंदे भारत ट्रेन सारख्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रत्यक्षात सुरू करून भारतीय रेल्वेने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे. प्रत्येक राज्यातून वंदे भारत चालविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. सध्या देशभरात ३५ वंदे भारत ट्रेनच्या ७० फेऱ्या होत आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या पाच वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.ज्यामध्ये एकट्या मध्य रेल्वेवर चार वंदे भारत धावत आहे.
ज्यामध्ये मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते मडगाव आणि नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावत आहे. आता आणखी दोन वंदे भारत ट्रेनची भर पडणार आहे. ज्यामध्ये मुंबई ते संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई ते संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदरबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.








