back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Goat Farming Gotha Scheme ; यावल पंचायत समितीत पशुपालक शेतकऱ्यांसाठीची शेळीपालन गोठा योजना बंद बाबत पालकमंत्री यांच्याकडे तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावल ( प्रतिनिधी ) ; – येथील पंचायत समिती यावलच्या माध्यमातुन राज्य शासनाची ग्रामीण क्षेत्रातील पशुपालक शेतकरी व नागरीकांच्या लाभासाठी नवसंजीवनी ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत शेळी पालन शेड ( गोठा ) उभारणी अनुदान ही योजना मागील एक ते दिड वर्षा पासुन बंद असल्याने तालुक्यातील नागरीकांमध्ये यावल पंचायत समितीच्या उदासीन कारभारामुळे ग्रामीण जनतेत नाराजी पसरली असुन या बाबतची दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार मुन्ना उर्फ पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे .

- Advertisement -

या संदर्भात शिवसेना ( शिंदे )गटाचे पदधिकारी तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यातील महायुती शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पशुपालक शेतकरी बांधवांचे हित लक्षात घेता मागेल त्याला शेळीपालन शेड उभारणीसाठी १०० % टक्के अनुदान योजना ही युद्धपातळीवर राबविली जात असुन,असे असतांना यावल पंचायत समितीच्या उदासिन व भोंगळ कारभारामुळे मागील एक ते दिड वर्षापासुन पशुपालक शेतकरी नागरीकांचे गाय म्हशी शेळीपालन शेड ( गोठा )उभारणी योजना मागणी साठी चे अर्ज स्विकारले जात नसल्याने पंचायात समिती यावल गटविकास अधिकारी व त्यांचे अधिकारी सहकारी यांच्या योजना अमलबजावणी बाबत उदासीन व भोंगळ कारभारा बद्दल नाराजी व्यक्त होत असल्याने शेतकरी हिताची ही योजना तालुक्यातील शेतकरी व शेळीपालन करणाऱ्या नागरीकांसाठी पुनश्च सुरू करावी व योजना अमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या अधिकारी यांच्यावर त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांचे कडे केली असल्याचे म्हटले आहे .

Goat Farming Gotha Scheme

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS