Thakare
साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | राज्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून गेल्या चार दिवसापासून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळते यावर मोठे राजकारण सुरु असतांना आता शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेतल्याने ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला असतांना आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, खोक्यातून सरकार आणू शकताला संस्कार नाही, माणसे विकली जाऊ शकतात पण संस्कार विकले जात नाही,असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे. पुढे म्हणाले की, तुमची संस्कृती, परंपरा जिवंत राहिली काय, टिकली किंवा नाही या पेक्षा खुर्ची टिकली पाहिजे, अशी राज्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण ऐकत आहोत सरकारमधील काही मंत्री नाराज आहेत. यातील एकही मंत्री तुमच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे नाराज नाही. सेवेकरी हे संस्कार देणारी माणसं आहेत त्यांनी एकत्र हाेणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे, यांची मला खात्री पटली आहे. कारणतुम्ही येतो म्हटल्यावर मला फोन आला आणि शिवाजी पार्कचा आपला दसरा मेळावा ही परंपरा कायम राहिली आहे. यामुळे मला आपले आशीर्वाद आहे हे स्पष्ट झाल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तीर्थक्षेत्रातील सेवेकरी मंडळी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पारंपारिक वेश पारिधान केल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते.