साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३ | देशभरात आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली असून यात राज्यातील अनेक पक्षाचे नेते दौरे करण्यास सुरुवात देखील केली आहे. यात प्रकाश आंबेडकर यांनी आज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, मराठा आरक्षणाबाबत सरकारची प्रामाणिकता नाही. सध्याचे सरकार सर्वसामान्यांशी खेळ करत आहे. मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. ज्यांनी सत्ता भोगली, जे सत्तेत आहेत, त्यांना चिंता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मराठा आरक्षणासाठी सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की,आरक्षण अशा पद्धतीने मिळणार नाही. सुप्रीम कोर्ट काय म्हणत हे महत्वाचे आहे. कोर्ट डेटा आणा असे म्हणत आहे. डेटा नाही म्हणून नाही असे कोर्ट म्हणत आहे. एक विंडो ओपन आहे. मात्र, त्या पद्धतीने जाणे गरजेचे आहे. मराठा समाजातील भांडण हे ऐतिहासिक आहे. एकमेकांच्यात भांडण आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेना आणि आमचे जागा वाटप झाले आहे, असे मी मानतो. बाकी त्रिकूटाबाबत त्यांनी निर्णय घ्यावा, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यश आहेत. अशात शिवसेना आणि वंचितची आघाडी झाली असून आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे.