उमरगा । साक्षिदार न्युज । तालुक्यातील मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रामीण प्रशाला माडज येथे भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते करण्यात आले. तहसील कार्यालय उमरगा, गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती उमरगा आणि ग्रामीण प्रशाला, माडज यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या पुस्तक प्रदर्शनामध्ये एकूण 2000 ग्रंथ मांडण्यात आले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, विठ्ठल गायकवाड, अध्यक्ष, छत्रपती तरुण शिवाजी तरुण मंडळ, माडज, मा. पेठसांगवीकर बी. एम. मुख्याध्यापक ग्रामीण प्रशाला माडज, शिक्षणविस्तार अधिकारी कदम, जोशी व केंद्रप्रमुख पांचाळ सर, सुतार सर उपस्थित होते. नारंगवाडी व गुगळगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या पुस्तक प्रदर्शनास भेट दिली.
यावेळी तहसीलदार गोविंद येरमे व गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी शाळेतील कुसुमाग्रज ग्रंथालयाची पाहणी केली ग्रंथ व्यवहार व ग्रंथालयातील पुस्तके पाहून समाधान व्यक्त केले.