जुन्या वादातून किराणा दुकानदाराला मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

धरणगाव ; – जुन्या भांडणाच्या कारणावरून किराणा दुकानदाराला अश्लिल शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक असे की, मोहम्मद मोईनुद्दीन सैफद्दीन शेख (वय-३२, रा. बेलदार मोहल्ला, धरणगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे बेलदार शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये किराणा दुकान आहे, किराणा दुकान चालवून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. जुन्या भांडणाच्या कारणावरून शनिवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता रियाजोद्दीन शेख लाडजी, शेख प्यारा शेख लाडजी, शेख लियाकत शेख प्यारा, जाहीद शेख प्यारा, शहनाजबी शेख रियाजोद्दीन आणि सिद्दिक शेख रियाजोद्दीन सर्व रा. धरणगाव यांनी मोहम्मद मोईनुद्दीन याला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केले. तसेच अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे ६ जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Old Dispute

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS