ऐनपूर (सुनिल भोळे) ; – येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात विश्व पर्यावरण संवर्धन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले. तर प्रमुख पाहुणे रासेयो विभागीय समन्वयक डॉ.जे.पी.नेहेते, रावेर महाविद्यालायचे प्रा.डॉ. गणपतराव ढेंबरे व प्रा.सी.पी.गाढे हे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी वाढती लोकसंख्या पर्यावरणास कशा पध्दतीने घातक ठरत आहे असे सांगितले. तसेच प्रत्येक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे तरच पर्यावरण टिकेल या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ डी बी पाटील यांनी केले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ एस एन वैष्णव, प्रा हेमंत बाविस्कर यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. रेखा पाटील, डॉ पी आर महाजन, डॉ एस ए. पाटील, डॉ एम के सोनवणे, प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. डॉ. पी. आर. गवळी, प्रा. डॉ. संदीप सांळुके, प्रा.नरेंद्र मुळे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. डॉ. संदीप सांळुके, प्रा.नरेंद्र मुळे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.