Gudhipadwa Gold Silver Price साक्षीदार न्युज | साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणाच्या शुभ मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. या निमित्ताने आज बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दुकाने सजली असून, राज्यात सोनं-चांदीच्या खरेदीतून ५ हजार कोटींहून अधिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे.
आज सोनं आणि चांदीच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जळगावात सोन्याचा भाव ९२,२०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे, तर चांदीनेही १,०५,००० रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे. भाववाढीमुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे. तरीही, शुभ मुहूर्ताचा लाभ घेण्यासाठी आज सोनं-चांदीची खरेदी जोमात होईल, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गुढीपाडवाच्या दोन दिवस आधीच सोन्याने ९२,००० रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तरीही जळगावच्या सुवर्ण बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे. सण आणि मुहूर्तांना भारतात विशेष महत्त्व असल्याने, या गुढीपाडव्याला राज्यात ५ कोटींहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजच्या भावाकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी, ग्राहकांचा खरेदीचा जोश कायम राहील, असा विश्वास सुवर्ण व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर बाजारपेठेत चैतन्य पाहायला मिळणार आहे.
LIC Smart Pension Plan 2025 ची धमाकेदार योजना: एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा 12,000 रुपयांची पेन्शन !
ATMFees | एटीएममधून पैसे काढणे महागणार: १ मे २०२५ पासून नवे शुल्क लागू
Raver Honey Trap | रावेर हनी ट्रॅप प्रकरणात 100 हून अधिक जण ,अनेकांनी आत्महत्या केल्याचा संशय ?