महेश मार्ग परिसर आयोजित माहेश्वरी समाजातर्फे गुढी पुजन आणि मतदान जनजागृती ”
आज मंगळवार दि 9/4/2024 रोजी गुढीपाडव्या निमित्त रिंग रोड वरील महेश चौकात गुढी उभारून तिचे पुजन करण्यात आले.

जागरुक नागरिक म्हणून 100% मतदान करून देशसेवेला हातभार लावू आणि शपथ मराठीतून येथील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते,एवं एक नियमित रक्तदाते मदन लाठी यांचे बरोबर सर्वांनी शपथ घेतली.
ह्या कार्यक्रमाला नितिन लढ्ढा ,नारायण लाठी , प्रा.संजय दहाड, संजय बिर्ला, मनिष झवर, योगेश कलंत्री,प्रमोद झवर, रमण लाहोटी,डॉ आनंद काबरा,गिरिधर झवर ,,सुमती नवाल मंगला बेहेडे,डॉ अर्चना काबरा आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वितेसाठी चंद्रशेखर जाखेटे,मधुर भट्टड, नितिन काबरा, अजय दहाड, मनोज दहाड ,दिपक काबरा, रुपेश काबरा, राहुल बिर्ला,हितेंद्र लाठी,शोभा काबरा पुनम काबरा अनिता काबरा मनिषा झवर आदींनी परिश्रम घेतले.








