back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

School girls ; शाळकरी मुलींना केले मानसिक क्षमतांचा वापर व सजगता यावर मार्गदर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव ( साक्षीदार न्युज ); – नंदीनीबाई वामनराव मुलींचे विकास विद्यालय येथे ‘संयम’ प्रकल्प अंतर्गत विद्यार्थिनी प्रबोधन’ लेवापाटीदार भातृमंडळ पुणे आणि वारजे व ज्ञान प्रबोधीनी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ८ वी ९ वी च्या विद्यार्थिनींना प्रबोधीत केले. पंचकोश, आरोग्य यांचे महत्व, शारीरिक व मानसिक क्षमतांचा वापर व सजगता जगताना कशी गरजेची असते, या बाबतीत प्रबोधीत केले गेले. प्रसारमाध्यमे, दुर्वर्तन गुड टच, बँड टच, ध्येय निश्चीती व उद्दीष्टपूर्ती कशी करावी त्याच्या पध्दती समजावून देण्यात आल्या. विद्यार्थिनींना व्यक्तिमत्व विकासासाठी पंचकोश कसे महत्त्वाचे आहे याची माहिती दिली. या माध्यमातून मुलांनी पालेभाज्या फळभाज्या व फळे खाणे महत्त्वाचे आहे तसेच सकस व पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगितले. स्वतःची ओळख निर्माण करून प्रत्येक कामात आनंद मानून नकारात्मक विचार सकारात्मक कसे करावे हे सांगितले.

- Advertisement -

School girls

पौगंडावस्थेत येत असताना मानसिक भावनिक व शारीरिक काय काय बदल होतात व त्याच्या शास्त्रीय माहिती असणं का महत्वाचे आहे. जननेंद्रीयांची माहिती व त्याचे कार्य, वैयक्तिक शारीरिक स्वच्छता, एचआयव्ही व एडसविषयी माहिती व त्यांची लागण होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली. लैंगिक दुर्वर्तनास बळी पडू नये म्हणून आत्मविश्वास, कणखरपणा ठामपणा सद्सदविवेक बुद्धी या गोष्टी कशा आत्मसात कराव्या याबद्दल सांगितले. व्यसनाधिनता का? कशी व कशाची, प्रसारमाध्यमे टिव्ही/मुव्ही/मोबाईलचे व्यसन ते कसे पसरते, त्याची इच्छा – सवय गरज कोणत्या पद्धतीने आयुष्य खराब करतात, व्यक्तीच्या विकासास बाधा ठरतात, त्यातून आहेर करते पडता येते. अशा परिस्थीतीत संयम राखून समतोल कसा साधावा. स्त्री-पुरुष समानता, ही सगळीकड़े अत्यंत रंजकतेने सांगितले जाते परंतु स्त्री- पुरुष पूरकता एका कुटुंबासाठी किती महत्वाची असते त्यामुळे चांगले कुटुंब हे चांगला समाज घडत असतो व चांगला समाज हा उत्कृष्ट राष्ट्र घडवित असतो. याच बरोबर पूरकतेतच संपूर्णता असल्यामुळे आपोआपच घटस्फोट होण्याचे प्रमाण कमी होण्यास व आपसातील सामंजस्य वाढीस लागून प्रेम वाढते व कुटुंब संस्था टिकतात.

- Advertisement -

School girls

मैत्री प्रेम व आकर्षण यातील फरक समजावुन देण्यात आला. प्रत्येक वेळी मनात निर्माण होणारे आकर्षण हे प्रेम असेलच/नसेलच असे नाही. त्यामुळे स्वतःच्या भावना कशा ओळखाव्यात सोबत असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव व भावना कशा ओळखाव्यात, ज्यामुळे भविष्यात व वर्तमान स्थितीत कुठलेही नाते हे लादल्या सारखे न वाटता त्यात गुण दोषांचा सहजतेने व सजगतेने स्वीकार असेल. व सुयोग्य जोडीदार निवडण्यास सहाय्यक ठरेल. ज्ञानप्रबोधीनीद्वारा प्रशिक्षीत प्रशिक्षीका निता वराडे व प्रशिक्षीका शुभांगी चौधरी यांनी सर्व विषयांवर विद्यार्थीनीना प्रबोधीत करण्यात आले. तसेच वरील सर्व विषय पीपीटी, नाटिका, लघूनाट्य स्वरुपातही सादर केले. प्रशिक्षीका ज्योती महाजन, सिमा गाजरे, निलीमा राणे, संगीता पाटील, निला चौधरी यांनी विविध नाटिका सादर करून, विषयाचे गांभीर्य समजावून दिले. सर्व सहभागी प्रशिक्षकांचे प्राचार्या चारुलता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. प्रशिक्षकांनी प्राचार्यांच्या सहकार्याचे कौतुक करून अभार प्रदर्शन केले.

School girls

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS