back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

गुलाबभाऊंचे भादली येथे १०१ दिव्यांनी झाले औक्षण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

घोषणांचा पाऊस – देखो औखोसे – गुलाब भाऊ आयेंगे लाखोंसे –

- Advertisement -

लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ – गुलाब भाऊ

ग्रामस्थांच्या व लाडक्या बहिणीच्या प्रेमाने भारावलो – गुलाबराव पाटील

- Advertisement -

भादली/जळगाव (सुनील भोळे) ; – शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचा भादली येथे काल रात्री पर्यंत जल्लोषात प्रचार सुरु होता. ‘ सर्वभाव ’ प्रतिष्ठान व नारखेडे मित्र परिवारातील लाडक्या भगिनींनी शिवसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांचा १०१ दिव्यांनी आरती करून औक्षण केले. मुस्लीम समाज बांधवांनी स्वागत केले. भादली येथे शेत रस्ते खडीकरण व डांबरीकरण, शादिखाना कब्रस्थान संरक्षक भिंत, उर्दुशाळा, ग्राम सचिवालय व अनेक सामाजिक सभागृह, गाव अंतर्गत मुलभूत सुविधा, विविध सामाजिक सभागृह अशी विविध विकास कामे झाल्यामुळे नागरिकांनी सत्कार करून “आम्ही तुमच्या सोबत आहोत.” असा प्रतिसाद दिला. गावाच्या राज मार्गावरून व चौका – चौकातून भव्य रॅलीचे स्वागत करण्यात आले. संवाद साधतांना गुलाबभाऊ म्हणाले की, ग्रामस्थांच्या व लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मी भारावलो असून त्यांचे ऋण सर्वांगीण विकास कामांतून फेडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी प्रचारा दरम्यान केले. प्रचार रॅलीमध्ये भादली येथे तब्बल ३ तास मोठ्या उत्साहात गुलाबभाऊंचे स्वागत करण्यात आले.

101 lamps
घोषाणानी वेधले लक्ष
‘देखो औखोसे – गुलाब भाऊ आयेंगे लाखोंसे’ , ‘लाडक्या बहिंचे लाडके भाऊ – गुलाब भाऊ’, ‘सर्वात दमदार – आमचे गुलाब भाऊंच आमदार, ’ जय भवानी – जय शिवराय आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद च्या घोषानानी नागरिकांचे लक्ष वेधले गेले. फटाक्यांची आतषबाजी, महिलंचे १०० दिव्यांनी एकाचवेळी केले औक्षण, २ वर्षाच्या कृष्णवी नारखेडे या चिमुरडीने गुलाबपुष्प देवून गुलाब भाऊंचे केले स्वागत केले तर ८ वीत जाणाऱ्या पियुष नारखेडे या मुलाने गुलाब भाऊंचे चित्र रेखाटून त्याची प्रतिमा भेट गुलाब भाऊना दिली.

101 lamps

यांची होती उपस्थिती
प्रचार रॅलीत माजी महापौर ललितभाऊ कोल्हे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, रवी कापडणे, माजी सभापती जितेंद्र नारखेडे, भाजपाचे चंद्रशेखर अत्तरदे, तुषार महाजन, पिंटूशेठ पाटील, मिलिंद चौधरी, संजय भोळे, हितेश नारखेडे, कांचन नारखेडे, रिता नारखेडे, पूनम रडे, दिपाली माळी, चारुलता नारखेडे, पूनम रडे, काजळ अत्तरदे, कुमुद जावळे, मनीषा पाटील, अंजली पाटील, हर्शल नारखेडे, भूषण पाटील, संदीप कोळी, सलीम पटेल, नजीर पटेल, श्याम कोगटा, सुनील बाविस्कर,किशोर कोळी, अरुण सपकाळे, तुषार महाजन, बापू महाजन, किशोर कोळी, प्रवीण खडसे , मनोज खडसे, दीपक धनगर, अनिल नारखेडे, सोपान कोळे, संजू कुंभार, राजू अत्तरदे, अजय महाजन, छोटू पाटील, भूषण रडे, नाना ठाकूर, विजय माळी व विनोद अत्तरदे यांच्यासह या परिसरातील महिलांसह महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होवून ‘धनुष्यबाणाला’ प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करीत होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS