back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

गावा – गावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट,

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोर- टू – डोर जयघोष

- Advertisement -

जळगाव /धरणगाव (सुनील भोळे ) ; – दि.10 – शिवसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांचा प्रचार धूमधडाक्यात चालू असून, ते स्वतः महायुतीच्या शिलेदारांसह अवघ्या १२ दिवसांत तब्बल १२१ गावांमध्ये भगव्या वादळाची तुफान लाट पोहचली असून प्रचारा दरम्यान एकेका गावात शिवसेनेच्या भगव्या झेंड्याचा झंकार, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गावागावात उमटलेली “धनुष्यबाण” ची गर्जना यामुळे मतदार संघात जिकडे तिकडे भगवामय वातावरण आहे. महिला कार्यकर्त्यांचा उत्साह तर विशेष लक्षणीय आहे. गुलाब भाऊंच्या स्वागतासाठी महिलांनी औक्षणाचा थाट उभा केला आहे, त्यांच्या मनात भाऊंच्या प्रती असलेल्या आदराचं आणि आपुलकीचं स्थान दिसून येत होत. ज्येष्ठांचे , संत-महंतांचे आशीर्वाद, आणि प्रत्येक घरातून मिळणारी सामान्य जनतेची दुवा हा प्रचारातला भावनिक साद दिसली.

village to village,

- Advertisement -

गुलाबभाऊंच्या नावाने गावा – गावात स्वागताची लाट उसळली असून कार्यकर्त्यांनी जबरदस्त प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीबोळात फडकणारा भगवा आणि जोशात घुमणाऱ्या घोषणा गुलाब भाऊंच्या जनाधाराचं प्रतिक बनले आहे. शिवसेनेच्या स्टाईलमध्ये प्रचाराचा हक्काचा झेंडा फडकवून, भाऊंच्या नावाच्या घोषणा हर एक गल्लीबोळात घुमत आहेत. लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आणि भगव्या लाटेने मोठ्या फरकाने गुलाब भाऊंच्या विजयाचा मार्ग आता अधिकच खंबीर व सुकर झाला आहे. झाला आहे.

प्रतापराव व विक्की बाबा यांचा डोर- टू – डोर गाठी भेटी

सर्वसामान्याच्या हृदयात कोरलेले गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ शेकडो तरुणांच्या सोबतीने त्यांचे दोन पुत्र जि. प. सदस्य प्रतापराव पाटील आणि लघु उद्योजक विक्की बाबा या दोन्ही भावंडांनी पायाला भिंगरी लावून जळगाव व धरणगाव तालुक्यातील धरणगाव शहरासह डोर- टू – डोर गाठी भेटी घेत 63 गावं पिंजून काढली. विकास कामांसाठी आपले आशीर्वाद व खंबीर साथ देण्याचे आवाहन करत आहेत. प्रचार रॅलीत युवकांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

village to village,

“जनतेच्या हृदयात कोरलेले नेतृत्व, निःस्वार्थ सेवाभावाने जनतेच्या समस्यांना अगदी घर दारातून भेटून सोडवणारे गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचे दोन पुत्र प्रतापराव पाटील आणि विक्की बाबा, हे दोन्ही भाऊ आपल्या आदरणीय वडिलांच्या (गुलाबराव पाटील) प्रचारार्थ जोशाने रस्त्यावर उतरले आहेत. जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील एकूण 63 गावांमधून पिंजून काढताना विकास कामांसाठी जनतेचे आशीर्वाद व खंबीर साथ देण्याचे आवाहन ते करीत आहे. युवकांच्या जोशात “जय भवानी, जय शिवाजी” चा गजर आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुळे भगवामय वातावरण आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS