back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

“गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुलाब भाऊंचे बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषेत बंजारा गीताने केले स्वागत !

- Advertisement -

जळगाव ( सुनिल भोळे ) दिनांक ५ ; – गेल्या अनेक वर्षांपासून गुलाबराव पाटील यांनी तांड्यांच्या विकासावर दिलेले हे योगदान लक्षात घेऊन, बंजारा तांडा वासियांनी ‘गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर’ म्हणजे त्यांना विजयी करण्यासाठी ठाम निर्धार व्यक्त केला आहे. “गुलाबराव पाटील हे आमचे तांड्यांचे खरे संरक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वात आमचे सर्व प्रश्न सोडवले जातील,”असा विश्वास तांडा वासियांनी व्यक्त केला.

तांड्याचा सर्वांगीण विकासासाठी दिला भरघोस निधी
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील लोकप्रिय नेते गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध तांड्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले गेले आहे. मतदारसंघातील वसंतवाडी तांडा, विटनेर तांडा, रामदेव वाडी, सुभाष वाडी, लोणवाडी, मोहाडी तांडा आणि धानवड तांडा येथील पाणीपुरवठा योजना मंजूर करून तांड्यांच्या मुलभूत सोयी-सुविधा उभारण्यात त्यांचे विशेष लक्ष राहिले आहे. गुलाबराव पाटील यांनी तांड्यातील नागरिकांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यांनी अनेक ठिकाणी सेवालाल महाराज भवनांचे बांधकाम मंजूर करून दिले आहे. गरम पंचायत कार्यालये बांधण्यात आली आहेत, आणि पोखरी तांड्याला स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा देऊन विकासकामांना गती दिली आहे. तसेच, तांड्यांपर्यंत रस्ते उभारून बससेवा पुरविण्यात आली आहे, ज्यामुळे तांडा वासियांचे जीवन सुलभ झाले आहे.

Banjara Tanda
Banjara Tanda

बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषेत बंजारा गीताने केले स्वागत !

जळगाव तालुक्यातील बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत, ह्रदयाला भिडणाऱ्या बंजारा गीतांच्या माध्यमातून वसंतवाडी येथे गुलाबराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. बंजारा समाजाच्या महिलांनी भावपूर्ण गीतांद्वारे आपल्या नेत्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त केला पारंपरिक बंजारा वेशभूषेत साजरा झालेला हा सोहळा उत्साहवर्धक ठरला, ज्यात गुलाबराव पाटील यांच्या कार्यासाठी असलेला त्यांचा उत्साह आणि समर्थन स्पष्टपणे दिसून आले. यावेळी सदर प्रचाररॅलीत तांड्यातील युवक, महिला, आणि ज्येष्ठ नागरिक सर्वजण गुलाबराव पाटील यांच्या प्रचारात एकत्र येऊन त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

यावेळी त्यांच्या सोबतभाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , मा. जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, पी.के. पाटील, सरपंच राजू भैया पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील,लोणवाडी सरपंच बाळू धाडी , अर्जुन पाटील, दशरथ चव्हाण, मांगो चव्हाण, राजाराम राठोड, जयश्री राठोड, मंगू राठोड, उदय चव्हाण, प्रेमराज चव्हाण, भिका राठोड, नवल राठोड, रविंद्र चव्हाण, गोकुळ राठोड, उखर्डू राठोड, सरीचंद राठोड, मोहाडी सरपंच डंपी सोनवणे, पंकज जाधव यांच्यासह परिसरातील महायुतीचे सरपंच , पदाधिकारी व कार्यकर्ते व तांडावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS