साक्षीदार न्युज ; – जळगाव येथील नेरी नाक्याजवळ असलेल्या श्री.वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटीतील संत रोहिदास समाज मंदिर सभागृहात शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता गुरू रविदास यांची 647 वी जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे,महापौर सौ.जयश्रीताई महाजन,भुसावळचे आमदार संजयजी सावकारे,जिल्हा शिवसेना प्रमुख विष्णूभाऊ भंगाळे,नगरसेविका सौ.सुरेखताई तायडे,चर्मकार विकास संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ सावकारे,संजय वानखेडे,वसंतराव नेटके,जिल्हाध्यक्ष चेतन तायडे,संत रोहिदास प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.संपतराव वानखेडे,गुरू रविदास क्लब चे अध्यक्ष डॉ.सुनील सूर्यवंशी,संत रविदास सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण खिरोडे,कार्याध्यक्ष काशिनाथ इंगळे, ग.स.सोसायटीचे संचालक तथा शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार,वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव नेटके,सचिव गोवर्धन चव्हाण,यशवंतराव ठोसरे ,वसंतराव सुरवाडे,दीपक नेटके,उमाकांत भारुळे,डॉ.गणेश भारुळे,अशोक शिंदे,किशोर तायडे,इंद्रनील मोरे ,उमाकांत भारुडे ,मुरलीधर घुले,अविनाश तायडे,साहेबराव ठोसर,सतीश शिंदे,दामोदर चव्हाण ,मुकेश चव्हाण,व मोठ्या संख्येने उपस्थित चर्मकार बंधू भगिनी आदींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या सुरवातीस सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री.वसंत सुरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्रांती व समतेचे प्रणेते गुरू रविदास, जाणता राजा शिवराय,थोर समासुधारक म.ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्ल्यारपण ,दीपप्रज्वलन करण्यात येऊन गुरू रविदासांची महाआरती करण्यात आली.या वेळेस प्रमुख अतिथिंचे यथोचित स्वागत वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटीतील रहिवाशांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी गुरू रविदास यांच्या जीवन कार्याची माहिती प्रा.धनराज भारुळे ,व सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी यशवंतराव ठोसरे यांनी देऊन समाजाने संतांची शिकवण आचरणात आणण्याचे आव्हान केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी आमदार राजूमामा भोळे,महापौर सौ.जयश्रीताई महाजन,विष्णू भाऊ भंगाळे,यानी चर्मकार समाजास मार्गदर्शन करताना सांगितले की सर्वांनी शिक्षण घेऊन संघटित व्हावे व गुरू रविदास यांच्या जीवन कार्याची प्रेरणा घेऊन समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचे व त्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित समाजबांधवांना देऊन गुरू रविदास जयंती निम्मित शुभेच्छा दिल्या.
या वेळेस डॉ.सुनील सूर्यवंशी,चेतन तायडे,यशवंतराव ठोसरे,वसंतराव नेटके यांनी देखील चर्मकार समाजातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचे आवाहन केले. या वेळेस नरोत्तमभाई परमार,साहेबराव ठोसर,दामोदर चव्हाण,हिरामण सोनवणे ,सतीश शिंदे,संजय वानखेडे,इंद्रनील मोरे,प्रा.राजेश बाविस्कर,प्रवीण बाविस्कर,कमलाकर ठोसर,संजय बाविस्कर,भानुदास कळसकर,अर्जुन भारुळे,आत्माराम तायडे,ज्ञानेश्वर बाविस्कर,पंढरीनाथ सावकारे,मुरलीधर घुले,मुकेश भाई चव्हाण,मनोजभाई सोलंकी,डॉ.गोपाळ सावकारे,मनोज सावकारे,जितेंद्र वनरा,डॉ.गणेश भारुळे ,चंद्रकांत वानखेडे,अशोक शिंदे,जितेंद्र वानखेडे,किशोर तायडे,गजानन दांडगे,सुनील दांडगे,सिद्धेश नेटके,अविनाश तायडे,प्रा.के. टी.भारुडे,भूषण ठोसर,आदित्य मोरे,उज्वल नेटके धनंजय वानखेडे,चंद्रकांत घुले,सौ.उषा नेटके,सौ.उर्मिला मोरे ,सौ. सुवर्णा भारुळे ,सौ.नीतू घुले,श्रीमती रजनी कळसकर,सौ.जयश्री तायडे,सौ.अनिता नेटके,सौ.भावना चव्हाण,श्रीमती सुमन रोझतकर,सौ.कळसकर सोनवणे,सौ.दमयंती परमार,प्रवीण बाविस्कर,वत्सलाबाई नेटके,सौ.कमल शिंदे ,राहुल ठोसर,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय वानखेडेसर यांनी तर आभारप्रदर्शन अविनाश तायडे सर यांनी केले.गुरू रविदास जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटीतील सर्व रहिवाशांनी विशेष परिश्रम घेतले.