साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | राज्यात गुटखा प्रतिबंध असला तरी भुसावळमध्ये गुटखा विक्री सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील यावल रोडवरील तापी नदीच्या पुलाजवळ २ रोजी रात्री साडेआठ वाजता वाहनासह एक लाख ७४ हजार ३१४ किमतीचा गुटखा शहर पोलिसांनी ताब्यात घेतला.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार,वाहनातून (एमएच १२ जेझेड ६७१६) संशयित आरोपी किशोर राजकुमार अरचिया (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) ९४ हजार रुपये किमतीचा गुटखा नेत होता. याची गोपनीय माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे एपीआय अनिल मोरे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुटख्याचे वाहन पकडले. याबाबत हवालदार राहुल भोई यांनी फिर्याद दिली आहे. तपास पीएसआय संजय कणखरे करीत आहेत.
Bhusawal Gutkha
- Advertisement -