साक्षीदार | ८ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक महामार्गावर नियमितपणे पोलिसांची गस्त असतांना अनेक संशयितरित्या दिसणाऱ्या गाड्यावर कारवाई करीत असतांना नंदुरबार जिल्ह्याच्या धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या नवापूर तालुक्यातील सोनखांब गावाजवळ गस्त घालत असताना पोलिसांना संशयितरित्या वाहन आढळून आला. यात अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत १९ लाख ५ हजार रुपयांचा अवैद्य गुटखा जप्त करण्यात आला.
गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक नवापूरहुन धुळेच्या दिशेने जात होता. यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीस्तव वाहतूक करताना मिळून आला. संबंधित वाहनास सोनखांब गावाच्या शिवारात शेरे पंजाब हॉटेलनजीक अडवले असता पोलीसांनी त्याची विचारपूस केल्यावर उडवा उडीचे उत्तरे दिले.
पोलिसांना संशयास्पद वाटल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यात केसरयुक्त विमल पानमसाला व व्ही वन तंबाखू असे एकत्रित साठा १७ हजार सहाशे पाकिटे त्यांची एकूण किंमत १९ लाख पाच हजार दोनशे रुपये तर वाहनाची किंमत १३ लाख रुपये असे एकूण ३२ लाख पाच हजार दोनशे रुपये मुद्देमाल हस्तगत केला. अन्न व औषध प्रशासन विभाग नंदुरबारचे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक भटू चौधरी याच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.