चाळीसगाव शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

चाळीसगाव ;- चाळीसगाव शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर  प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिनही सराईत गुन्हेगारांवर हद्दपार करण्याचे आदेश चाळीसगाव प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद हिले यांनी केले आहे.

- Advertisement -

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, आगामी लोकसभा निवडणूकीच्या काळात शांतता व भयमुक्त वातावरण होण्यासाठी चाळीसगांव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी केली आहे. या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस संदीप पाटील यांनी चाळीसगाव शहरातील सराईत गुन्हेगार राहूल आण्णा जाधव, श्याम उर्फ आण्णा नारायण गवळी आणि हैदरअली आसीफअली सैय्यद तिघे रा. चाळीसगाव यांच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून चाळीसगावचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांच्याकडे पाठविला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांनी प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यात राहूल जाधव आणि श्याम गवळी या दोघांना प्रत्येक १ वर्षांसाठी हद्दपार तर हैदरअली आसीफअली सैय्यद याला दोन वर्षांसाठी जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश पारित केले आहे. हद्दपारीच्या प्रस्तावासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ विनोद भोई, पोना तुकाराम चव्हाण यांनी सहकार्य केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS