वळती पुणे (सुनिल भोळे) : – धर्माची निर्मिती प्रत्यक्ष परमेश्वराने केलेली आहे, असे वेदांमध्ये सांगितलेले आहे. धर्म मनुष्य ,प्राण्यांचे रक्षण करीत असते त्याचप्रमाणे धर्म ज्या ठिकाणी आचरणात येत असेल तेथे विजय प्राप्त होतो.आणि जिथे अधर्म आहे तिथे पराजय असतो. धर्म बाजारामध्ये मिळत नाही. धर्मा चरण केल्यामुळेच धर्म कळतो. धर्म धारण करावा लागतो. त्याचप्रमाणे जेथे दया असेल तेथेच धर्म असतो अधर्माचा नाश होतो असा इतिहास आहे. अधर्मावर धर्माने, असत्यावर सत्याने , अत्याचारावर सदाचाराने मात करून सात्विकता जगविता येते.सात्विक प्रवृत्ती धर्माचे आचरण करण्याचे लक्षण आहे. सात्विक भावामुळे हृदयामध्ये ‘करुणा ‘ निर्माण होऊन दया निर्माण होते व धर्म धारण केल्या जातो.
धर्मामुळे सुख तर अधर्मामुळे दुःख प्राप्त होते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान ह्यांनी येथे व्यक्त केले. वळती येथे सर्व ग्रामस्थ व गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवचनाचे पुष्प गुंफताना डॉ.रवींद्र भोळे पुढे म्हणाले की धर्म धारण करणारे व धर्माचरण करणारे सक्षम नेतृत्व पुज्यनिय नरेंद्र मोदी जिच्या रूपाने पंतप्रधान आपल्या देशाला लाभले हे आपले परम भाग्य आहे. याप्रसंगी दत्ता महाराज झेंडे, दत्ता महाराज कुंजिर वळती, बाळकृष्ण सूर्यवंशीमहाराज वळती, हभप डॉ रवींद्र भोळे महाराज , उरुळी कांचन, गोकुळ महाराज कुंजीर, श्रावणी महाराज वनपुरी, यादव महाराज सनईकर, यांची प्रवचने झाली. तसेच पायल महाराज कुंजीर, गणेश महाराज कुंजीर, चेतन महाराज शिंदे, मयूर महाराज मोरे, दिलीप महाराज जगताप पुणे, दिलीप महाराज मोरे, दिपालीताई महाराज वाघोलीकर, यांची कीर्तने झाली. याप्रसंगी एल बी कुंजीर उद्योजक, सौ कुसुमताई कुंजीर माजी सरपंच वळती, जालिंदर कुंजीर, भाऊसाहेब सूर्यवंशी, भगवान शंकर कुंजीर, भगवान यशवंत कुंजीर, सुदाम बबन कुंजीर, शैलेश नामदेव कुंजीर, विलास रामभाऊ कुंजीर, शिवाजी किसन कुंजीर, दामोदर दिनकर कुंजीर ,प्रामुख्याने उपस्थित होते. हा हा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समस्त गावकरी व अखंड हरिनाम सप्ताह कमिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वळती श्री विठ्ठल रुक्माई मंदिर तालुका हवेली जिल्हा पुणे येथे पार पडला.