पुरस्कारांमध्ये मित्र परिवार व बोरगाव बु् गावाचा सिंहाचा वाटा …
जाफ्राबाद (साक्षीदार न्युज ) ; – गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करून जनसेवेसाठी सदैव तत्पर असणारे बोरगाव बु येथील युवा तरुण ,हर्षल मोतीराम फदाट यांना माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने सण २०२४ मधील राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यांना युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगांवातील डॉक्टरला केली मारहाण ; CCTV मध्ये सर्व घटना कैद
आपल्या समाजकार्याने पंचक्रोषीत प्रसिद्ध असलेले हर्षल पाटील फदाट यांना नुकतेच राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार हा माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेकडून दरवर्षी देण्यात येतो.या वर्षीचा सदर पुरस्कार हर्षल मोतीराम फदाट यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजसेवा करताना कुठलाही स्वार्थ न ठेवता आपल्या परीने समाजातील वंचित घटकांसाठी जेवढे करता येईल ते करतो.लोकांना सुखा- दुःखात व संकट प्रसंगी मदत करुन सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी ते अग्रेसर असतात.
मित्रपरिवाराच्या साथीने व गावाच्या पाठिंब्यामुळे मुळेच मी पुरस्काराची पायरी चढु शकल्याने, या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय त्यांनी मित्रपरिवार व बोरगाव बु् गावाला दिला आहे.त्यांना राज्यस्तरीय युवा समाज रत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते दिनांक २१ सप्टेंबर रोजी मलकापूर येथे दिमागदार सोहळ्यात हर्षल फदाट यांचा सन्मान करण्यात आला.राज्यस्तराय युवा समाज रत्न पुरस्काराने हर्षल मोतीराम फदाट यांना पुरस्कार सन्मानित झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन व विशेष कौतुक केले जात आहे. यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक,शैक्षणिक,विधी ,साहित्य,कला व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.