जालना ( साक्षीदार न्युज ) :- देशाच्या व मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपले आयुष्य पनाला लावले. वर्तमानात खुप कमी स्वातंत्र्य सैनिक हयात आहेत व दुर्देवाने भविष्यात काही वर्षानंतर उरले सुरले वृद्ध स्वातंत्र्य सैनिक सुद्धा हे जग सोडुन गेलेले असतील. कोनीच स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्याचा शतक महोत्सव बघायला हयात नसतील.
LIVE : लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री शिंदेंसह आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जळगावात !
भारत देशाने स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण केली असून आपन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या प्रसंगी हर्षल पाटील फदाट यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत ,जिल्हाधिकान्यांनी अमृत महोस्वाच्या निमित्ताने जालना जिल्हयातील हयात स्वातंत्र्य सैनीकांचा सत्कार सन्मान करुन त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करावा. अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.