पत्नी मुलीची गळा चिरून हत्या करून स्वतःही संपविले जीवन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

देऊळगाव गुजरी येथील घटना

- Advertisement -

जामनेर :- धारदार शस्त्राने पत्नीसह अवघ्या ११ महिन्याच्या मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना देऊळगाव गुजरी येथे १२ रोजी उघडकीस आली असून दोघांच्या हत्या केल्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेत आत्महत्या करून जीवन संपविल्याची घटना घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

देऊळगाव गुजरी येथील पोलीस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके याच्याशी विवाह झाला होता. पतीला दारूची सवय असल्याने त्याने लग्न झाल्यापासून लहानमोठे वाद उकरून काढत प्रतिभाचा मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले. दोन लहान मुली व

- Advertisement -

त्यातच पतीचे दारूचे व्यसन याचा त्रास असह्य झाल्याने गत चार महिन्यांपासून प्रतिभा पतीला सोडून ११ महिन्यांच्या मुलीसह माहेरी निघून आली होती. मध्यंतरी विशालने प्रतिभाची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला. परंतु, प्रतिभाने त्यास नकार दिला. शुक्रवारी देऊळगाव गुजरी येथे प्रतिभाचे आई-वडील शेतात गेले असताना विशाल पुन्हा प्रतिभाला नेण्यासाठी तसेच तिची समजूत घालण्यासाठी आला होता. प्रतिभाने त्याच्या सोबत जाण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने विशालने धारदार शस्त्राने प्रतिभा आणि चिमुकल्या दिव्याची गळा कापून हत्या केली व तेथून फरार झाला. प्रतिभाच्या वडिलांना ही माहिती समजताच त्यांनी घरी धाव घेतली, त्यावेळी त्यांना आपली मुलगी प्रतिभा व नात दिव्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच जळगाव येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच फत्तेपूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी देऊळगावकडे घाव घेतली. पत्नी व चिमुकल्या मुलीचा खून करून फरार झालेल्या विशालने दुधलगाव गाठले व कमरेला दगड बांधून गावातील एका विहिरीत उडी घेऊन त्याने स्वतःचेही जीवन संपविले.

याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश फड व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS