साक्षीदार | २४ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील अनेक तरुण – तरुणीसह शासकीय अधिकाऱ्यांना देखील ऑनलाइन गेमिंगचा मोठा फटका बसत असतांना यात पोलीस विभागातील देखील कर्मचारी सुटलेले नाहीत. नुकतेच मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असताना ऑनलाइन गेमिंगमध्ये ६२ लाखांच्या कर्जात बुडाला. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने लुटमारीचा मार्ग निवडला असता लुटमार करीत असताना दोन तरुणांवर गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र घटनास्थळी दुचाकी सोडून पाळल्याने तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हवलदाराचे नाव सूरज देवराम ढोकरे (वय ३७) असे असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. तर अजीम अस्लम सय्यद (वय ३०) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र फिरोज रफिक शेख वय (२७) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान १६ ऑक्टोंबरला अजीमचा मुंबई येथील रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पडघा पोलिसांनी अटक हवलदारावर हत्येचाही गुन्हा दाखल करत गेल्या नऊ दिवसापासून तो पोलीस कोठडीत असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एसपी विक्रम देशमाने त्यांनी दिली आहे.
अटक आरोपी हवालदार यापूर्वीही अंबाडी भागात येऊन ग्रामीण भागातील नागरिकांना धमकी देऊन हजरो रुपये घेऊन जात होता. याच हजरो रुपयातून तो कर्ज फेडत होता. मात्र लुटमारी करत असतानाच त्याने केलेल्या गोळीबारात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला. तर याआधीही आरोपीकडून अशाच प्रकारची घटना घडली आहे का ? आणखी काही गुन्हे घडले आहेत का ? याचा तपास पडघा पोलीस करत असल्याची माहिती एसपी विक्रम देशमाने यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.