साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील राजकारणात गेल्या वर्षभरापासून शिवसेनेवर सुनावणी सुरु असतांना आता राष्ट्रवादी देखील सुनावणी मध्ये अडकणार आहे आज शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे यांनी आज भावूक होत आपली भूमिका मांडली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाले कि, मी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढले आहे? मी राजकारणात कोर्टबाजीसाठी आलेले नाही. मी सर्वसामान्यांची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आले आहे. मला वाटलं नव्हतं असा दिवस येईल. पण, सत्यासाठी जे काही करावं लागेल, ते आम्ही करु. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राज्याची जनता यांच्या प्रेमासाठी आम्ही येथे आहोत,
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे प्रकरण न्यायालयात आहे. याबाबत अनिल परब यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ठाकरे गट आणि पवार गटाची याचिका एकत्र करण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला न्याय मिळेल. नैतिकतेची ही लढाई आहे. व्यक्तिगत लढाई नाही. सत्य आणि असत्यामधील ही लढाई आहे. शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे ही लढाई जनतेची आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.