मुरूमच्या ग्रामीण रुग्णालयातील पथकाने घेतला पुढाकार
उमरगा ( सुरज आबाचने) ; – हृदयासंबंधित जन्मजात होणारा आजार म्हणजे सीएचडी हा आजार वरनाळवाडी येथील आठ महिन्याचा बाळ आरव महादेव अक्कलकोटे यास जन्मजातच जडला होता त्याच्यावर उपचार करण्यासाठी मुरूम ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य विभागाने पुढाकार घेतला व मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे आणि मोफत शस्त्रक्रिया करण्यात आले शुक्रवारी दि २७ रोजी आरव यास उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
उमरगा तालुक्यातील मुरूम ग्रामिण रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत संबंधित पथकाने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वरनाळवाडी येथील अंगणवाडीतील बालकांचे आरोग्य तपासणी केली होती यावेळी आठ महिन्याचा बालक आरव अक्कलकोटे यास जन्मजातच हृदयासंबंधित होणारा सी एच डी आजार असल्याचे तपासणीत दिसून आले .त्यामुळे वैद्यकीय अधिक्षक डॉ महेश अरदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाचे प्रमुख डॉ.जी.एल.कांबळे तसेच डॉ. तेजस्वीनी सोनवणे त्याचप्रमाणे औषध निर्माण कर्मचारी गजानन ठोंबरे,अधिपरिचारिका पुष्पां गोरे यांनी पुढाकार घेतला व सदरील बालकाला धाराशिव येथे प्राथमिक उपचार्थ दाखल करून पुढे शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई येथील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले दि ४ डिसेंबर रोजी आरव याच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आले असून त्यास शुक्रवारी २७ डिसेंबर रोजी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले