अमळनेर तालुक्यात गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – अमळनेर शहर आणि ग्रामीण भागात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अचानकपणे गारपीटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे रब्बी हंगाम देखील हातातून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरासह तालुक्यातील सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपीटीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी आणि काही फळ पिकांच्या बागांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात अमळनेर तालुक्यातील पातोंडा, नांद्री, दहीवद, मुंगसे, सावखेडा, निमगव्हाण खेडी यागावात गारपीटीने झोडपून काढले आहे. यात काही घरांची पडझड देखील झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. प्रशासनाने मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून शेत शिवारात जावून पंचनामा करण्यास सुरूवात केली आहे. शासनाने नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS