साक्षीदार | २५ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील अनेक राज्यात आगीचे प्रमाण वाढत असतांना गुजरातमधील अरवली जिल्ह्यात एका कंपनीला आग लागून केमिकलने भरलेले ६० टँकर जळून खाक झाले आहेत. हि घटना बुधवारी अचानक आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अरवली जिल्ह्यातील एका कंपनीत बुधवारी अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र एका क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आग संपूर्ण कंपनीत पसरली. कंपनीत केमिकलने भरलेले टँकर होते. हे टँकर या आगीत सापडले. टँकरमध्ये केमिकल भरलेले असल्यामुळे सर्व टँकर आगीत भस्मसात झाले. आगीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून आगीचे लोट उटताना दिसत आहेत.
या आगीत आतापर्यंत जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाले असून कोट्यवधी रुपयाचा फटका बसला आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत कंपनीचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. या घटनेची नोंद झाली असून आग कशामुळे लागली याची चौकशी सुरू आहे.