Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे. जूनपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 84 जणांचा बळी गेला असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पीडितांना आर्थिक सहाय्य देण्यास सुरुवात झाली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. केवळ आठ दिवसांत मदत उपलब्ध झाल्याने स्थानिकांना थोडासा दिलासा मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निधी तुटवड्याची चिंता न करता मदत वाटपाचे अधिकार सरकारकडून देण्यात आले असून, आवश्यक असल्यास उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
जनावरांच्या नुकसानीसाठी मदत
-
दुधाळ जनावर दगावल्यास 37,500 रुपये
- Advertisement - -
ओढ काम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये
-
लहान जनावरांसाठी 20,000 रुपये
-
शेळी, मेंढी, बकरी, डुक्कर दगावल्यास प्रत्येकी 4,000 रुपये (मर्यादा 30 प्राणी)
घरांच्या नुकसानीसाठी तरतूद
-
झोपडी कोसळल्यास 8,000 रुपये
-
पक्के घर पूर्णतः कोसळल्यास 12,000 रुपये
-
गोठ्याच्या नुकसानीसाठी 3,000 रुपये
शेतकऱ्यांसाठी भरपाई
-
कोरडवाहू पिकांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर
-
बागायती पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर
-
बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर
-
पूरग्रस्त जमीन दुरुस्त होणारी असल्यास 18,000 रुपये प्रति हेक्टर
-
दुरुस्त न होणाऱ्या जमिनींसाठी 5,000 ते कमाल 47,000 रुपये प्रति हेक्टर
कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रति कोंबडी 100 रुपये अनुदानाची तरतूद असून, एका कुटुंबाला जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.
सांगोला तालुक्यातील मदत
सांगोला तालुक्यातील महापुरात मृत्यू झालेल्या चार कुटुंबियांना एकूण 16 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यापैकी तिन्ही कुटुंबांच्या खात्यात मदत जमा झाली असून, चौथ्या कुटुंबालाही लवकरच रकम मिळणार आहे. महापुरात बळी गेलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची थेट बँक खात्यातून मदत देण्यात आल्याने दुःखाच्या काळात काही प्रमाणात आधार मिळाल्याचे स्थानिकांनी नमूद केले.