व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंग उमरगा तालुकाध्यक्ष पदी हॅलो उमरगा संपादक बालाजी सर्वसाने यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

उमरगा (साक्षीदार न्युज) : – जगभरातील ४७ देशात पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहन सोहळा शासकीय विश्रामगृहात नुकताच पार पडला.

- Advertisement -

यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार, राज्य खजिनदार प्रवीण पावले, धाराशिव व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.

- Advertisement -

अत्याधुनिक युगात पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे किती गरजेचं आहे जो पत्रकार याचं ज्ञान घेऊन पत्रकारिता करेल त्यालाच भविष्य असल्याचे डिजिटल विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी सांगितले. तसेच त्यांनी AI कसे काम करते याचे प्रात्याक्षिकही सादर केले.

तसेच जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी संघनटनेचे आजवरचे काम आणि पुढील काळात संघटना काय काम करणार आहे याची माहिती दिली.

यावेळी मनोज जाधव यांनी जिल्हा कार्याध्यक्षचा,विशाल जगदाळे जिल्हा उपाध्यक्ष,सर्जेराव गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष,राम थोरात जिल्हा कार्यकारणी,जावेद शेख जिल्हा कार्यकारणी, सचिन तोग्गी तुळजापूर तालुकाध्यक्ष,अहमद अन्सारी तुळजापूर कार्याध्यक्ष,सचिन शिंदे तुळजापूर तालुका सरचिटणीस,उमरगा तालुकाध्यक्ष बालाजी सर्वसाने,उमरगा राहील पटेल तालुका सरचिटणीस,शोएब काझी वाशी तालुकाध्यक्ष,तानाजी सुपेकर भूम तालुकाध्यक्ष, शहानवाज तांबोळी परंडा तालुकाध्यक्ष, तर प्रतीक वाघे यांनी तुळजापूर शहराध्यक्ष व येडशी येथील सुभान शेख यांना धाराशिव शहराध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी केले तर आभार जुबेर शेख यांनी मानले.यावेळी जिल्ह्याभरातून पत्रकार यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS