मा. प्रतिभा ताई शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – उत्तर महाराष्ट्रात जनसंघटनेचे लढाऊ नेत्या म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रतिभाताई शिंदे यांची ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव श्री. के सी वेणूगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

प्रतिभाताई यांनी लोकसभा निवडणुकांअगोदरच दिल्ली येथे मा राहुलजी गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राहुल गांधी यांच्या दोन्ही भारत जोडो यात्रांमध्ये त्या राहुल सोबत सक्रिय सहभागी होत्या त्याच प्रमाणे लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी खान्देश मधील प्रामुख्याने नंदुरबार येथील निवडणुकीची प्रचार धुरा सांभाळत रावेर, जळगांव, व धुळे मतदारसंघामध्ये ही महाविकास आघाडीचा प्रचार यशस्वीपने करत धुळे व नंदुरबार येथील उमेदवारांच्या विजयात महत्वपुर्ण कामगिरी बजावली होती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा नाना पटोले यांनी त्यांची ऑल इंडिया काँग्रेस कमेटीकडे शिफारस केल्या नुसार काँग्रेस चे अध्यक्ष मा मल्लिकार्जुन खर्गेजी यांनी त्यास मंजुरी देत काँग्रेसचे महासचिव मा के सी वेणूगोपाल यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून तसे पत्र त्यांना दिले आहे.

- Advertisement -

येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रतिभाताईंना हे पद मिळाल्याने जळगांव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवे बळ मिळाले असून सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS