हॉटेल मालकाची ८ लाखात फसवणूक प्रकरणी नोकराला ३ दिवस पोलीस कोठडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव । सुनिल भोळे । जळगाव शहरातील नामांकित हॉटेल आणि लॉजिंगच्या ८ लाख १४ हजारांचा नोकरानेच अपहार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित नोकराला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत रामदास पेठकर यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे मालकांचे रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेल सिल्व्हर पॅलेस नावाचे नामांकित हॉटेल आहे. एप्रिल २०२४ पासून हॉटेलच्या सर्व व्यवहारांची तपासणी केली असता दर महिन्याला काही काही दिवसांनी थोडी थोडी रक्कम कमी असल्याचे निदर्शनास आले. आदित्य सुनील वाघ रा.कानळदा रोड याने या कालावधीत नोकर या नात्याने त्याच्याकडे विश्वासाने दिलेली ८ लाख १४ हजारांची रक्कम योगेश महाशब्दे, हर्षल बागुल यांच्याकडे जमा न करत अपहार केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहर पोलिसांनी आदित्य सुनील वाघ याला अटक करून शुक्रवारी न्या.देशमुख यांच्या न्यायालयात हजर केले असता रक्कम हस्तगत करणे, गुन्ह्यातील सहभाग तपासणे आणि पुढील तपासकामी त्याला दि.६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिर्यादीतर्फे अँड.रोहन बाहेती यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS