म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

लाडक्या बहिणींनी केल औक्षण : कार्यकर्त्यांचा उत्साह

- Advertisement -

म्हसावद/जळगाव ( sunil bhole ) ;  – शिवसेनेचे नेते व मंत्री, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात प्रचाराला जोमाने सुरूवात केली आहे. या गटातील म्हसावद, बोरणार, लमांजन, कुऱ्हाळदे, बिलवाडी, डोमगाव, बिलखेडा, वावडदा या गावात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून, ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिले तर गावातील महिलांनी महायुतीचे उमेदवार गुलाबभाऊंचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.

Gulabrao Patal

- Advertisement -

गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारा दरम्यान म्हसावद, बोरणार, लमांजन, कुऱ्हाळदे, बिलवाडी, डोमगाव, बिलखेडा, वावडदा या गावांमध्ये जाऊन थेट जनतेशी संवाद साधला. त्यांच्या प्रचार रॅलीत जेष्ठांसह महिलांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. प्रत्येक गावांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या, तर महिलांनी औक्षण करून त्यांचा सन्मान केला. म्हसावद – बोरणार या जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटील यांचेवर नागरिकांचे असलेले प्रेम आणि विश्वास हे त्यांच्या विजयाची खात्री देणारे दिसून आले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, सचिन पवार,भाजपाचे भाऊसाहेब पाटील, रामचंद्र पाटील, रवी पाटील, प्रदीप पाटील, उपसभापती साहेबराव वराडे, दूध संघाचे रमेशआप्पा पाटील, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, रवींद्र कापडणे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, अर्जुन पाटील, सचिन पाटील, सरपंच ललित साठे, जळके सरपंच राजूभैय्या पाटील, चंद्रशेखर पाटील, नारायण चव्हाण, सरपंच गोविंद पवार, समाधान चिंचोरे, शितलताई चिंचोरे, जेष्ठ शिवसैनिक विष्णूआप्पा चिंचोरे, धोंडूभाऊ जगताप, दीनोद पाटील, समाधान पाटील, सुनील बडगुजर, सुनिल मराठे, मार्केटच्या यमुनाबाई सपकाळे, उपतालुका प्रमुख मंगलाताई गोपाळ, अनिता चीमनाकरे, पी. के. पाटील, जितू पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना – रीपाई महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gulabrao Patal

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS