Religion ; धर्म या संकल्पने पेक्षा मानवता श्रेष्ठ आहे : जयसिंग वाघ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Religion ; अमळनेर (साक्षीदार न्युज ) :- धर्म हि संकल्पना हजारो वर्षां पासून चालत आली आहे , धर्म मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ असल्याने त्याचे अनुसरण करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगून माणसांना धार्मिक बनविण्यात धर्मगुरू यशस्वी झाले आहेत , धर्म माणसा माणसात प्रेम निर्माण करतो , धर्म माणसाचा इश्र्वराशी संवाद साधतो , तो मृत्यू नंतर आपल्याला स्वर्गात स्थान देतो असे गोंडस वाक्य वापरून धर्म माणसाला आपल्याकडं आकर्षित करत आला . यात माणूस हजारो वर्षां पासून अडकत आला आहे . धर्म मानवतेची , प्रेमाची , शांततेची शिकवण देत असला तरी जगात सर्वात जास्त लोकांचा बळी धर्माने घेतले आहेत असे परखड मत प्रसिध्द साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .

- Advertisement -

👉🏽 एका लहान मुलाने सांगितले कि, या सर्व योजना बंद करा

अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे अमळनेर येथे १७ ऑगस्ट रोजी आयोजित ‘ सर्व धर्म परिषद ‘ मध्ये वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते .जयसिंग वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की धर्म या संकल्पने पेक्षा मानवता श्रेष्ठ आहे , धर्मा धर्मात संघर्ष होतो तेंव्हा तो संघर्ष मानवतावादी लोक पुढाकार घेवून मिटवत आलेले आहेत . मानवतावाद जिवंत आहे म्हणून धर्म जिवंत आहे हे जर प्रत्येक धर्माने समजून घेतले तर जगात येक नवी क्रांती होवू शकते . ती क्रांती यशस्वी झाली तर वंशवाद , जातीयवाद , धर्मभेद गळून पडेल व मानविहत्या रोखण्यात , मानवाचे जीवन सुखमय करण्यात आपल्याला यश मिळेल . हजारो वर्षांपासून धर्म प्रेमाची शिकवण देत आला पण सर्वात जास्त हिंसा माणसाने धर्मा साठीच केलेली आहे . धार्मिक युध्ये वीस वीस वर्षे चालली आहेत व त्यात लाखो लोकांचे नाहक बळी गेलेले आहेत . भारतातही धर्माच्या नावावर लाखो लोक आपल्या प्राणास मुकले आहेत असेही वाघ यांनी स्पष्ट केले . जगातील प्रत्येक धर्माने महिलांना तुच्छ लेखले आहे , प्रत्येक धर्मात पुरुषसत्ताक व्यवस्था आहे , प्रत्येक धर्माचे संस्थापक पुरुष आहेत , सर्वधर्म परिषद घेण्याचे व धर्मा धर्मात सामंजस्य निर्माण करण्याचे काम धर्मगुरूंचे असताना महिला सर्वधर्म परिषद घेताहेत ही एक ऐतिहासिक व दिशादर्शक बाब आहे असेही वाघ यांनी स्पष्ट केले .

मंचावर साध्वी प्रमेदिता , भिख्खू नागसेन , मकसुदभाई बोहरा , केरसी करांजिया , संत बाबा धीरज सींघजी , मुफ्ती हरून नदवी, रेव्हरंड विशाल वळवी , वेदमूर्ती भागवतकार अमोल शुक्ल ई. मान्यवर होते .मुफ्ती हरून नदवी यांनी अतिशय आवेशपूर्ण भाषण करून हिंदू मुस्लिम धर्म कसे एकच आहेत याचे विश्लेषण केले .
भदंत नागसेन यांनी बौद्ध धर्म आजच्या काळात कसा उपयुक्त आहे आहे याबद्दल माहिती सांगितली . अन्य धर्मगुरूंनी आपापल्या धर्माचे महत्व विषद केले .
नॅनो संशोधक तथा माजी प्राचार्य डॉ. एल. के. पाटील यांनी धर्माची शिकवण व मानवाचे प्रत्यक्ष आचरण कसे भिन्न आहे याचे सविस्तर वर्णन करून धर्मव्यवस्थेवर प्रखर टीका केली .

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार तथा राष्ट्रीय. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व मंचावरील धर्मगुरू तथा अन्य निमंत्रितांशी प्रत्यक्ष संवाद साधला .डॉ. अपर्णा मुठे , सरोज भांडारकर , कांचन शहा , वसुंधरा लांडगे या महिलांच्या पुढाकाराने ही परिषद घेण्यात आल्याने त्यास आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले , अमळनेर पोलीस स्टेशन ने परिषदेच्या यशस्वीते करिता विशेष परिश्रम घेतले .

Religion

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS