साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३ | सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही सत्य असतात तर काही बनावट असतात असाच एक सत्य व्हिडीओ समोर आला आहे. देशभरातील अनेक राज्यात दारू बंदी आहे तर काही ठिकाणी बेकायदेशीरपणे दारू विक्री होत आहे. सध्या बिहारमधील अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. एका कारचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी ड्रायव्हरला वाचवण्याऐवजी गाडीमधील दारु पळवून नेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोकांच्या या कृतीवरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
संपूर्ण दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारू आणि दारूची तस्करी यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. गेल्या सोमवारी (३० ऑक्टोबर) सिवानमधून दारू लुटल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि आता गयामध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. ज्यामध्ये लोकांच्या कृतीवर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. गयामधील डोभी-चतरा रस्त्यावरील चतरा वळणावर सोमवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी एक दुर्घटना घडली. विदेशी दारूने भरलेल्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली खरी, पण लोकांनी जखमींना मदत करण्याऐवजी गाडीतील दारु पळवून न्यायला सुरूवात केली.
ये लूट का दृश्य शराबबंदी वाले राज्य बिहार के गया का बताया जा रहा है. जहां एक गाड़ी का एक्सीडेंट हुआ, गाड़ी में शराब की पेटियां भरी हुईं थी, और फिर सालों से मुफ्त की शराब के लिए तरस रहे राहगीरों ने अपना फर्ज निभाया..
#lpgcylinder @yadavtejashwi @NitishKumar #Bihar #Gaya… pic.twitter.com/n6LsUOd8SN— Atul Malikram (@amg24x7) November 1, 2023
अपघातातग्रस्त कारचा ड्रायव्हर कसा आहे? कोणाला किती गंभीर दुखापत झाली याची साधी कोणी विचारपूसही करत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दारुपुढे कोणाच्या जिवाचीही पर्वा या लोकांना नाही का? असा सवाल काही युजर्सनी विचारला आहे, तर आणखी एकाने दारुबंदीमुळे लोक दारु पिणे बंद करत नाहीत हे स्पष्ट झाल्याचेही म्हणले आहे.