साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून ठाकरे व भाजपमध्ये वाक्य युद्ध सुरु आहे. त्यात आता संजय राऊत यांच्या वक्तव्याने देखील भर पडली आहे. सध्या ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलेलं दिसत असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडतायत.
काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर (ठाकरे गट) गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांनी त्यांच्यावर मोठी आगपाखड केली आहे. किती खोटं बोलतायत गृहमंत्री. एकतर त्यांचे त्यांच्या खात्यावर नियंत्रण नाही, किंवा त्यांना त्यांचा गुप्तचर विभाग चुकिची माहिती पुरवत आहे. इतके अपयशी गृहमंत्री महाराष्ट्राने आजवर पाहिले नव्हते, अशा शब्दांत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.