युट्युबवरील व्हिडीओ लाईक केला अन ५० लाखांचा बसला फटका !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | प्रत्येक व्यक्ती फावल्या वेळेत मोबाईलमधील सोशल मिडीयावर आपले मन रमवित असतो. त्यातील आपण नेहमीच युट्यूबवर बराच वेळ देखील घालवत असतो. एखादा व्हिडीओ लाईक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. डिजिटल युगात लोक स्मार्ट झाले आहेत. मात्र काही लोकांना असलेल्या अपुऱ्या माहितीचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेताना दिसतात. सायबर ठग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन लोकांचा फसणूक करत असतात. असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये YouTube चे व्हिडीओ लाईक करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला ५० लाखांचा फटका बसला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पुण्यातील शुलभ नांगर नावाच्या तरुणाची सायबर चोरट्यांची फसवणूक केली आहे. यूट्युबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाला ५० लाख रुपयांना गंडा घातला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी शुलभ नांगर यांना मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी यूट्युबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी आकर्षक कमिशन मिळेल, असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी नांगर याला सुरवातीला १३५० रुपये कमिशनही दिले. त्यानंतर टेलिग्राम ॲपवर लिंक पाठवून कमिशनचे आमिष दाखवून व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी ४९ लाख ६८ हजार रुपये घेतले. त्यानंतर आपल्याला कुठलेच कमिशन मिळाले नाही आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS