साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे किर्तनाचं साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगू लागली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, आपल्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये आपण सर्वांना चारी मुंड्या चित करून पुन्हा भगवा घेऊन येऊ मात्र नशिबात नसेल तर येणार नाही, असे विधान त्यांनी केले. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण कार्य करत आहोत. मात्र मतांसाठी आपण हे कार्य करत असल्याची टीका होते. मी मतं मिळावीत म्हणून कुठलंही काम करत नाही. धर्मासाठी हे काम करतो आहे. आपण समाजाचं देणं लागतो म्हणून आपण ते करत आहोत. त्यामुळे नशिबात असेल तर मी निवडणुकीत पुन्हा निवडून येईल नसेल तर येणार नाही मात्र हे जे कार्य मी करत आहे ते मरेपर्यंत असेच करत राहणार, अस स्पष्ट मत व्यक्त करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या विरोधकांना उत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटील हे शिंदे गटातले आक्रमक शैलीचे नेते मानले जातात. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जळगावात रंगली आहे.