Devendra Fadnavis Chief Minister साक्षीदार न्युज ; (सुनिल भोळे) ; – राज्यात विधानसभेचा निकाल लागल्यापासून मुख्यमंत्रिपदावरुन मोठी रस्सी खेच सुरु आहे . विधानसभेची मुदत संपून दोन दिवस झाले असून महायुतीचा मुख्यमंत्रिपदाबाबत कोणाताही निर्णय अध्याप देखील झाला नाही . त्यातच एकनाथ शिंदे यांनी काळ पत्रकार परिषद घेत भाजप जो निर्णय घेणार तो निर्णय मलाया मान्य असेल असं त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आपला निर्णय सांगितल्या पासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर चांगळीच टीका केली आहे . ते म्हणाले कि , जे स्वत:ला शिवसेना समजत होते त्यांनी आपल्या पक्षाचा निर्णय काय घ्यायचा तो अधिकार अधिकार दिल्लीला सोपविला आहे . यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये, असं संजय राऊत म्हणाले. ते दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत होते. संजय राऊत यांनी सांगितले कि, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास त्यांचं स्वागत करणार .