Devendra Fadnavis Chief Minister ; नवी दिल्ली (साक्षीदार न्युज) : – दिल्लीत नेमके काय सुरु आहे हे कळायला मार्ग नाही कारण फडणवीस मुख्यमंत्री नाही तर रवींद्र चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आल्याची चारचा सध्या सुरु आहे . महाराष्ट्राच्या राजकारणात महायुत सुरु असलेलले राजकीय नाट्य कधी संपणार हे सांगणे कठीण आहे . ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे आणि सोहळ्यासाठी मुहूर्तही देखील ठरविन्यात आलेला आहे. इतकंच काय तर, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे असणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, आता मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत पुन्हा एकदा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे.
दिल्लीत सध्या मोठ्या राजकीय घडताना दिसत आहेत. दिल्लीत शनिवारी (३० नोव्हेंबर) रात्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी नड्डा आणि भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात एक तास बैठक झाली. तसेच, विनोद तावडे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा झाल्याचीही माहिती आहे. इतकंच नाही तर फडणवीसांचे अगदी जवळचे मानले जाणारे आमदार रवींद्र चव्हाण यांना अचानक दिल्लीत बोलावण्यात आले आहे . त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुर झाल्या आहेत.
भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. तसेच, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने फडणवीसांनाच पसंती दिल्याचीही माहिती आहे. पण, विनोद तावडे आणि अमित शाह यांच्या बैठकीत बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. भाजपाकडून नवीन डाव खेळाला जाऊ शकतो जर, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काही आक्षेप असेल तर रवींद्र चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी लागू शकते .
आमदार रवींद्र चव्हाण यांना फडणवीसांनी अचानक पालघर चा दौरा अचानक रद्द करून त्यांना लगेचच दिल्लीत बोलावून घेतले आहे . जर, फडणवीसांच्या नावावर आक्षेप असेल तर फडणवीस रवींद्र चव्हाण यांचं नाव समोर करु शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.