back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

Bodwad Nagar Panchayat | बोदवड शहरातील अवैध देशीदारू वाईन शॉप यांना नगरपंचायतचे अभय : हरिदास गनबास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bodwad Nagar Panchayat साक्षीदार न्यूज । सुरेश कोळी । बोदवड शहरातील सर्व अवैध देशी दारू दुकान, वाईन शॉप, बियर बार,परमिट रूम या दुकान मालकांनी दुकान सुरू करताना आवश्यक कागदपत्रेची पूर्तता न करता शासनाची फसवणूक करून आपल्या स्वार्थासाठी शासनाची व जनतेची फसवणूक करणाऱ्या दुकान मालकांवर व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी ज्यांनी त्यांना आतापर्यंत पाठिंबा दिला आहे. त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी या अनुषंगाने मलकापूर येथील शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख हरिदास गनबास यांनी नुकतीच राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव यांच्याकडे कारवाई करून परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे व तत्कालीन कालावधीत ज्या विभागांनी नाहरकत व परवानगी दिली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी निवेदनात केली आहे. त्या बाबत बोदवड नगर पंचायत प्रशासनास सुद्धा माहितीस्तव सूचित केले आहे.

- Advertisement -

बोदवड शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा गरम असताना आता अवैध शासकीय जागेवर महसूलच्या जागेत सुरू असलेल्या दारू दुकानां ना बोदवड येथील मुख्य अधिकारी सतीश पुदाके पाठीशी घालत असून त्यांना कोणत्याही प्रकारे अद्याप पर्यंत नोटीसा दिलेले नाही आणि ज्या दुकानदारांनी पैसे दिले नाही त्यांना नोटीस देऊन त्यांचे अतिक्रमण तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.असा मतभेद का अशी चर्चा बोदवड शहरात सुरू आहे. बोदवड शहरांमध्ये एकूण 1000 दुकाने आहेत त्या सगळ्या अतिक्रमण मध्ये आहेत. आणि सर्व दुकाने ह्या रस्त्याच्या आजूबाजूला किंवा छोट्या मोठ्या नाल्यावर आहेत हे नगरपंचायत ला दिसत नाही का? की जाणून बुजून डोळे बंद केले आहेत. गोरगरिबांवर अन्याय करणे आणि श्रीमंतांना पाठीशी घालणे हे मुख्याधिकारी यांना जड जाणार त्यांची नोकरी सुद्धा जाऊ शकते परंतु हे त्यांच्या लक्षात येत नसेल का? असा प्रश्न जनतेमध्ये व्यक्त केला जात आहे. अतिक्रमण काढायचे असेल तर पूर्ण शहरातले काढावे अन्यथा दोन चार लोकांवर कारवाई करून काय फायदा अशी मागणी ही दुकानदारांकडून केली जात आहे.

प्रांत अधिकारी भुसावळ यांच्या आदेशामध्ये संपूर्ण बोदवड शहरातील अवैध दुकाने, अवैध आस्थापणे यांची चौकशी करून ते अडथळे दूर करण्यात यावे.असे सांगितले आहे तरीसुद्धा नगरपंचायत फक्त एकतर्फी कार्यवाही करीत असल्याचे दिसून येत आहे. कारण एका दुकानामागे त्याचे एकट्याचे पोट नसून त्याच्या घरच्यांचे पूर्ण कुटुंब अवलंबून असते याचा विचार नगरपंचायतीने करायला हवे. कार्यवाही करायची असली तर सरसकट करावी अशी मागणी निवेदनाद्वारे हरिदास गनबास यांनी केलेली आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने न्याय मागू असे सर्व दुकानदारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी राजकीय गणिते बदलली! मुंबईत ठाकरे एकत्र, पुण्यात पवारांची युती ठरली?
31 डिसेंबरसाठी घरीच दारूची पार्टी करता तर मग सावधान! घरात किती दारू ठेवू शकता ? वाचा नियम
गर्भवती महिलांनी शिवलिंगाची पूजा करावी का? शास्त्र काय सांगते, जाणून घ्या संपूर्ण सत्य
नगराध्यक्षांना किती पगार मिळतो? A, B, C वर्गातील नगरपरिषदांचे मानधन आणि भत्त्यांचा सविस्तर खुलासा
दारू पिल्यानंतर या 3 गोष्टी चुकूनही खाऊ नका; हँगओव्हर वाढतो आणि तब्येत बिघडू शकते

Bodwad Nagar Panchayat

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS