साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील मेहरून परिसरातील एका ठिकाणी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली एमआयडीसी पोलिसांनी पकडले असून याप्रकरणी तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरून ट्रॅकवर असणाऱ्या कृष्णा लॉन्स जवळ १५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अवैधरित्या एक ब्रास वाळू ट्रॅक्टर मालक किशोर नाईक रा.जामनेर यांच्या सांगण्यावरून संशयित संदीप शेगोकार, अनिल ब्रिजलाल नाईक, विशाल भाऊ सिंग पवार, जितेंद्र कनीराम राठोड या चौघांनी ट्रॅक्टर मालक किशोर नाईक याच्या सांगण्यावरून अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून एमआयडीसी पोलिसांनी १५ रोजी सकाळी ०८.४५ वा. मेहरुन ट्रॅकवर असलेल्या कृष्णा लॉन्स जवळ, जळगांव येथे वरिल वर्णनाची व किंमतीची ट्रॅक्टर मालक किशोर रामदास नाईक रा. जामनेर जि.जळगांव यांचे सागण्यावरुन त्यांच्या ताब्यातील वरील वर्णनाचे ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमधुन विना परवाना वाळु (गौण खनिज) ची चोरटी वाहतुक करीत असतांना मिळुन आले . त्यांच्याकडून ३ लाख रु. किंमतीचे स्वराज ७४४ FE कंपनीचे निळया रंगाचे ट्रॅक्टर विना नंबरचे त्यात असलेले ३००० रु किंमतीची ०१ ब्रास वाळु (गौण खनिज) निळया रंगाच्या विना नंबरच्या ट्रॉलीमध्ये भरलेली आढळून आली. तसेच त्यांच्याकडून वीस हजार रुपये किमतीचे मोटरसायकल MH १९ EC ८५२८ १५,०००रू किंमतीची हिरो डेस्टीनी या कंपनीची राखाडी रंगाची MH १९ DZ ८१०१ असे असलेली मोटार सायकल असा एकूण तीन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकाँ नितीन पाटील करीत आहे.