इस्राइल-हमास युद्धाचा फटका : पेट्रोल-डिझेल स्वस्त कि महाग ? 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | जगभरात होत असलेल्या महागाईचा फटका गेल्या काही वर्षापासून देशाला देखील बसत आहे. गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. यामध्ये इस्राइल-हमास युद्धाचा फटका कच्च्या तेलावर दिसून येत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता नवे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत उसळण पाहायला मिळाली त्यामुळे आज बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा दर $0.09 वरुन 0.10 टक्क्यांनी वाढला यात $87.74 प्रति बॅरल आहे तर WTI क्रूड $0.02 वरुन 0.02 टक्क्यांनी वाढून $85.99 प्रति बॅरल आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आजही स्थिर आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचे आजचे दर किती पाहूया.

मुंबईत पेट्रोल १०६. ३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपयांनी विकले जात आहे.

- Advertisement -

पुण्यात पेट्रोल १०६.१७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा आजचा भाव ९२.६८ रुपयांनी विकलं जातंय. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात किचिंत घट झाली आहे.

ठाण्यात पेट्रोलचा आजचा भाव १०६.०१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२. ५० रुपयांनी विकलं जाईल. पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये काही पैशांनी आज घसरण पाहायला मिळाली आहे.

नागपूरमध्ये पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ९२.५९ रुपये मोजावे लागतील.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS