ऐनपुर (साक्षीदार न्युज) ; – परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे ज्युरीस इंडिया लॉ फर्म दिल्ली चे ॲड.राजबीर बंसल यांनी भेट दिली. शिक्षक हेच खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण चे कार्य करीत आहे. शिक्षकी पेशा हा खूप पवित्र पेशा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे अनन्य साधारण महत्व आहे. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण यशस्वी होतो असे मत मांडले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद साधला शिक्षण व शिक्षकांचे जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच त्यांनी ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षण प्रसाराच्या कार्याचे कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अँड. राजबीर बंसल यांचे शाल, नियतकालिक व गुजर बोली भाषेचे पुस्तक देऊन स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री.भागवत भाऊ पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.श्रीराम पाटील, प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने, संचालक श्री.विकास महाजन, ऐनपुर गावाचे सरपंच श्री.अमोल महाजन व वैष्णवी फर्टीलायझर चे संचालक श्री.राहुल पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.पी.आर गवळी यांनी केले.