शेतकऱ्यांचासाठी महत्वाची बातमी : मंत्रिमंडळात झाले महत्वपूर्ण निर्णय !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | राज्यातील बदलत्या हवामानामुळे अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने हातातोंडाशी आलेलं पिक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. अशात बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्वाचे ८ निर्णय घेण्यात आलेत. नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आलेत.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज, बुधवारी (२९ नोव्हेंबर, २०२३) पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री महोदय उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करून योग्य ती मदत केली जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार मदत दिली जाणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

महत्वाचे ८ निर्णय
१. अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई (मदत व पुनर्वसन) देणार.
२. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात केले जाणार आहे. यामुळे झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळालाय.
३. राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबवले जाणार आहे. त्यानुसार शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश आहे.
४. मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करण्यात येणार आहे.
५. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली जाणार आहे.
६. औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन देण्यात येणारे.
७. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करण्यात येणार आहे.
८. शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिकडचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. सर्व पंचनामे झाल्यावर निर्णय होईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. १८ जिल्ह्यात नुकसान झालं आहे. अजून अंतिम अहवाल येणार आहे. अवकाळीची सर्वात जास्त काळजी स्थानिक आमदाराला असते, असं मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS