शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : केंद्र सरकारने अखेर घेतला निर्णय !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ | राज्यात गेल्या काही महिन्यापूर्वी कांदा शेतकरी मोठा संकटात आला होता. केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावला होता. सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवत अनेक दिवस शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ठिकठिकानी आंदोलने केली. बरेच दिवस बाजार समित्या या बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. मात्र आता कांद्यावर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यात शुल्क मागे घेण्यात आले आहे.

- Advertisement -

कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क केंद्राकडून मागे घेण्यात आल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढली आहे. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर नवीन नियम लावले आहेत. कांदा इतर देशात निर्यात करण्यासाठी 800 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यातमूल्य लागू राहणार आहे. तसेच 31 डिसेंबरपर्यंत हे निर्यातशुल्क लागू करण्यात येणार आहेत,यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कांद्याचा साठा संपू नये, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, भाव स्थिर रहावे या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

सध्या शेतकऱ्यांकडील कांद्याचा साठा संपत आल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे त्यामळे कांदा दरात झपाट्याने वाढ होत आहे. घाऊक बाजारासह किरकोळ बाजारातील कांद्याचे दर 100 रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत. कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क मागे घेण्यात आलं असलं तरीही निर्यात करण्यासाठी 800 डॉलर मेट्रिक टन ही किंमत अनिवार्य करण्यात आली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS