साक्षीदार | ५ नोव्हेबर २०२३ | देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो या सणादरम्यान अनेक गृहिणी सोन्यासह चांदीच्या दागिन्याची देखील खरेदी करीत असतात. त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची असणार आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात साप्ताहिक घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर खूपच कमी होते. अशापरिस्थितीत लोकांना दिवाळीपूर्वी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे.
गेल्या आठवडय़ात २४ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 61,075 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. तर सोमवारी सोन्याचा हा दर 61238 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम १६३ रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात लक्षणीय घट झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 70771 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर चांदीचा हा दर सोमवारी 71931 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात चांदीच्या दरात प्रति किलो ११६० रुपयांची घसरण झाली आहे.
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 510 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेला होता. चांदी 5693 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.