प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे धावणार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३

- Advertisement -

महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रवाश्यांना आता नागपूर जाणे सोईचे होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस दि. ६ डिसेंबर रोजी आहे. यानिमित्त नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान तीन विशेष गाड्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर या दरम्यान सहा विशेष गाड्या. तर अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान एक विशेष गाडी असेल. क्र. ०१२६२ ही गाडी नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी ११:५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ३:३० वाजता पोहोचेल. क्र. ०१२६४ ही गाडी दि.५ डिसेंबर रोजी नागपूर येथून ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी ११:४५ वाजता पोहोचेल.

- Advertisement -

क्र. ०१२६६ ही विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी नागपूर येथून ३:५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०:५५ वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर इथे थांबे असतील.

तसेच क्र. ०१२४९ ही गाडी ६ डिसेंबर रोजी ४:४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ९:३० पोहोचेल. तर क्र. ०१२५१ ही गाडी दि.६ डिसेंबर रोजी ६:३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०:३० वाजता पोहोचेल. क्र. ०१२५३ ही गाडी ७ डिसेंबर रोजी दादर येथून मध्यरात्री पाउन वाजता सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी दुपारी ३:५५ वाजता पोहोचेल.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS